लोहोणेर येथे हायस्पीड ऑप्टिक फायबर इंटरनेट सेवेचा शुभारंभ

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,Mo. 9130040024,सध्या स्थितीत कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी तसेच अनेक सेवा इंटरनेट अभावी तात्काळ उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. लोहोनेर व परिसरातील विद्यार्थी, पालक, व्यापारी वर्ग तसेच वर्क फ्रॉम होम व्दारे वर्क करणारे नोकरदार वर्ग यांच्यासाठी मोरया सेंटर यांच्यामाध्यमातून हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली. या सेवेचा शुभारंभ लोहोनेर गावच्या सरपंच श्रीमती. पुनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लोहोनेर ग्रा.पं.सदस्य रतीलाल परदेशी, सामाजिक कार्यकर्ते रमेश अहिरे, दीपक देशमुख, यशवंत अहिरे, योगेश पवार, पंडित पाठक, भाऊसाहेब शेवाळे, रुद्रयोग सामाजिक संस्थेचे श्री. विशाल देशमुख, प्रा. मनोज देशमुख , प्रा. महेश देशमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या साठी शुभम व्यवहारे, ओंकार तिसगे, विश्वजीत पाटील, अनिल गायकवाड, सागर परदेशी, सौरभ शेवाळे, हर्षल खैरनार आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमावेळी मोरया इंटरनेट सर्विसेस चे संचालक आदित्य शेवाळे, हर्षल भावसार व गौरव परदेशी यांनी लोहोनेर व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. असे आव्हान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here