कोरानाच्या वाढत्या प्रार्दुभावमुळे बुंधाटे व डांगसौंदाणे ग्रामस्थांना निर्णय हप्त्यामध्ये तीन दिवस कडकडीत बंद

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामधील बुंधाटे व डांगसौंदाणे ग्रामपंचायत ने घेतला निर्णय तीन दिवस कडक बंद फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पासुन गावात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मेडिकल, दवाखाने ,बँकिंग सुविधा फक्त गावातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त गाव 100% कडकडीत बंद असणार आहे. कोणीही व्यवसाय करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली. तसेच कोणीही विना मास्क आढळून आल्यास दोनशे रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल याची सर्व ग्रामस्थांनी सांगितले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here