घाटनांद्रा शिवारात गारांचा पाऊस. कांदा पिकाचे अतोनात नुकसान

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा सह धारला परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व गारपीट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मेघगर्जनेसह गारांचा  पावसाला सुरुवात झाली गारांचा पाऊस एवढा जोरात होता की अक्षरशा काही कळायच्या आतच एकदम गार सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे परिसरातील कांदा गहू हरभरा सूर्यफूल ज्वारी आदी पिकांना फटका बसला आहे अनेक ठिकाणी मक्याच्या पूजा मध्ये पाणी शिरले तसेच रब्बी मका पिकांची कणसे शेतामध्येच पडून आहेत कांदा पीक थोड्या प्रमाणात तग धरून असतांनाच गारांनी  हजेरी लावल्याने कांदा सह हरभरा  पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची धारला येथील सरपंच वंदना दादाराव ढोके उपसरपंच नामदेव नागरे तुकाराम डोके घाटनांद्रा येथील सरपंच निर्मलाताई तडवी उपसरपंच रेखाबाई कृष्णा मोरे चेअरमन अशोक गुळवे माजी पंचायत सदस्य रामचंद्र मोरे ग्रामपंचायत सदस्य  शिवनाथ चौधरी संतोष बिसेन आनंदा मोरे मोसिन पठाण मोहिब मुल्ला शेख नवाब यांच्यासह आदींनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here