राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बँक ऑफ बडोदा शाखेला निवेदन

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,Mo. 9130040024: लोहोणेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत गेल्या १५ ते २० दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे त्यामुळे परिसरातील बँकेचे ग्राहक, शेतकरी, व्यापारी, विध्यार्थी, गृहिणी यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. या लोहोणेर शाखेत वासोळ, खालप,महालपाटणे, सावकी, विठेवाडी, भउर यांची असंख्य खाती आहेत.नेटवर्क अभावी संगणक प्रणाली बंद असल्याने पैसे काढण्याचे व टाकण्याचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने ग्राहक चांगलेच हैराण झाले आहे.सदर नेटवर्क व बँक आर्थिक व्यवहार चालू करण्यासाठी लोहोणेर येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले, तसे नझाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे तालुका उपाध्यक्ष दिपक देशमुख यांनी इशारा दिला आहे यावेळी समता परिषदेचे रमेश आहिरे, लोहोणेर शाखाअध्यक्ष मनोज देशमुख, देवळा तालुका कार्य.सदस्य अदित्य शेवाळे , सो.मीडिया ता. चिटणीस पंकज शेवाळे, सो.मीडिया ता.संघटक गणेश देशमुख, नागेश निकम, मनोज बच्छाव, अशोक सूर्यवंशी,समाधान पवार आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here