सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भराडी येथे विनामास्क फिरणा-या नागरिकावर दंडात्मक कारवाई मास्क वाटप करून केली जनजागृती

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सर्व नागरिकांनी कोरोणासंबंधी नियमांचे पालन करावे…डि वाय एस पी पुजा गायकवाड,कोरोणा व्हाईरस हा संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढतच असुन शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोणाने शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे.ग्रामीण भागात कोरोणा रूग्णसंख्येला आळा बसावा व कोरोणा रूग्णाची संख्या नियंञणात रहावी यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने डि वाय एस पी पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील भराडी येथे पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार रोजी विनामास्क दुकानदारावर व नागरिकावर दंडात्मक कार्यवाही त्या नागरिकांना जनजागृती व्हावी या उद्देशाने मास्क वाटप करण्यात आले.सिल्लोड ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या व ग्रामंचायतच्या वतीने अचानक कारवाई करण्यात आल्याने अनेक नागरिक व दुकानदार विनामास्क आढळुन आल्यामुळे त्यांना दंडाची पावती देऊन दंड वसूल करण्यात आला.
सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी शासनाने कोरोणासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून नियमित मास्क वापरणे, समाजिक अंतर ठेवणे आदी नियम पाळून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डि वाय एस पी पुजा गायकवाड यांनी केले आहे. यावेळी पोलीस उपनिरिक्षक पंडीत इंगळे,भराडी बिट जमादार देविदास जाधव,पोलीस नाईक संदीप कोथलकर,पोलीस कर्मचारी कैलास द्वारकुंडे,उपसभासभापती काकासाहेब राकडे, सरपंच पप्पु जगनाडे,आरेफ पठाण,नारायण खोमणे,ग्रामसेवक आशोक दौड,कर्मचारी कैलास शेळके,एजाज पठाण लक्ष्मण राकडे,गणेश खोमणे,सोमनाथ गोरे,आमोल महाजन,नारायण महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here