सिल्लोड प्रतिनिधी:-विनोद हिंगमिरे: कोरोणा व्हायरस हा संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढतच असुन शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोणाने शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे.ग्रामीण भागात कोरोणा रूग्णसंख्येला आळा बसावा व कोरोणा रूग्णाची संख्या नियंञणात रहावी यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विठ्ठल चव्हान, काकासाहेब सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील आमठाणा येथे पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार रोजी विनामास्क दुकानदारानवर व रसत्याने फिरणाऱ्या नागरीकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली त्याच प्रमाणे दोन चाकी,चार चाकी वाहन घेऊन विना मास्क गाड़ी चालकांवरही दंडात्मक करवाई करुण मास्क वाटप करण्यात आले.
सिल्लोड ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या व ग्रामंचायतच्या वतीने अचानक कारवाई करण्यात आल्याने अनेक नागरिक व दुकानदार विनामास्क आढळुन आल्यामुळे त्यांना दंडाची पावती देऊन दंड वसूल करण्यात आला.
सर्व नागरिकांनी व व्यवसायिकांनी शासनाने कोरोणासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून नियमित मास्क वापरणे, समाजिक अंतर ठेवणे आदी नियम पाळून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत च्या तर्फे करण्यात आले. यावेळी आमठाणा बिट जमादार विठ्ठल चव्हाण ,पोलीस नाईक काकासाहेब सोनवणे,पोलीस पाटील शरद वाघ,अरुन मोरे,सुदाम मोरे, जनार्धन सोमासे, संजय बनसोड, बाबूलाल निंभोरे, ज्ञानेश्वर चाथे,कृष्णा सोमासे,अवचित तायडे, श्रीराम डफळ,बाजिराव दानेकर, विष्णू सोमासे बाबूराव तायडे,ज्ञानेश्वर तायडे, ज्ञानेश्वर कदम,त्रिंबक तायडे,पंडित लुलेकर, विलास मोरेआदी उपस्थित होते.
Home Breaking News आमठाणा येथे विनामास्क फिरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व मास्क वाटप करून केली...