मराठवाडा लॉ कृती समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन सादर करून फिस माफ न केल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा

0

औरंगाबाद – मराठवाडा लॉ कृती समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन सादर करून फिस माफ न केल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा,कृती समितीच्या वतीने याआधी 8 मार्च रोजी निवेदन सादर केले होते परंतु विद्यापीठाने त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली त्याच अनुषंगाने आज पुन्हा निवेदन सादर करून मराठवाडा लॉ कृती समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने कृती समितीच्या वतीने संविधानिक मार्गाने उपोषण करणार असल्याची भूमिका मांडली आहे.विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर कोविड मुळे आर्थिक नुकसान झाले आहे.सर्वच अर्थव्यवस्था कोलमडली आहे.गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क सक्तीने वसूल केली आहे याच अनुषंगाने कृती समिती उपोषण मार्गाने न्यायिक भूमिका घेणार असल्याचे सांगितले आहे,सदर उपोषण करताना कोविड चे सर्व नियम पाळून करणारा असल्याचे मराठवाडा लॉ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here