लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील आठवडी बाजार कडकडीत बंद

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील आठवडी बाजार कडकडीत बंद…
दिनांक अकरा मार्च ते चार एप्रीलपर्यत भराडी येथील आठवडी बाजार भरणार नसल्याचे ग्रामपंचायत कडुन जाहीर,लॉकडाऊन संदर्भात मा, जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी सात मार्चला अंशतः लॉकडाऊन संदर्भात आदेश काढलेले आहेत .त्यानुषंघाने अकरा मार्च ते चार एप्रिल पर्यंत शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण व शहरी भागात पूर्ण लॉकडाऊन राहणार असल्याचा आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे. दहा मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदरील आदेश काढला आहे.त्यामुळे अकरा मार्च ते चार एप्रिल पर्यंत शनिवार व रविवार रोजी संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातसुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.महसूल,पोलीस,पंचायत समिती,नगरपालिका व इतर सर्व संबंधित विभागामार्फ़त
यावर पूर्ण नियंत्रण ठेवले जाणार आहे.दहा मार्च रोजी मा जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार दंडात्मक कारवाया करून गुन्हे दाखल केले जाणार आहे असल्याचे सांगितले आहे.शनिवार व रविवार रोजी कोणत्याही नागरिकांनी विनाकारण विनामास्क बाहेर फिरू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोणाचा प्रादुर्भाव ग्रामीण व शहरी भागात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार खबरदारीचा उपाय म्हणुन सिल्लोड तालुक्यातील भराडी ग्रामपंचायतीने शनिवार रोजी भरणारा आठवडी बाजार कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन सर्व व्यापा-यांना बाजार भरणार नसल्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भराडी बाजारपेठेत व परिसरातील गावात शुकशुकाट बघावयास मिळाला जिल्हाधिकारी यांनी केलेल्या लाॅकडाऊनचे पालन व्हावे त्या अनुषंगाने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप कोथलकर भराडी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवुन होते.त्यामुळे भराडी येथील आठवडी बाजार असुनही आत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी व व्यावसायिकांनी बाजारपेठेतील अपापली दुकाने बंद ठेवुन लाॅकडाऊनमध्ये सहभाग नोंदविल्याचे चिञ बघावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here