पिंपळदर येथील रस्त्याचे काम थांबल्याने नागरिकांमध्ये असंतोष.

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: बागलाण तालुक्यातील सटाणा येथे राज्य महामार्ग क्रं २७ चे गाव लगत असलेले कॉक्रीटी करणाचे काम बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामपूर _ सटाणा_ पिंपळदर_कळवण_नाशिक हा राज्य महामार्ग क्रं.२७ असून या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी जोरात सुरू करण्यात आले होते, पिंपळदर गावा नजिक जात असलेला हा राज्य महामार्ग .गावाजवळ काँक्रीटि म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे, पावसाळ्यात सतत रस्त्यावर पाणी साचते व डबके तयार होतात, खड्डे पडतात ,या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात,म्हणून रस्त्याला उंची देण्यासह कॉक्रीट करून रस्ता मजबूत करण्याचे काम एच.पी.एम.इन्फ्रा.लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला, परंतु एच.पी.एम. इन्फरा कंपनीने कुठलेही सबब कारण न देता काम अचानक पणे अर्धवट करून बंद करून दिला आहे. ग्राम पंचायत पिंपळदर ने गावाजवळील थोडेसे वळण सरळ करण्यास सांगितले असता सदर कंपनीने काम बंद करून टाकले. अर्धवट झालेल्या व अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रोजच अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत, अनेकांना दुखापती नां सामोरे जावे लागत आहे,सुदैवाने अजून पर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही पण, खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे.हा रस्ता नाशिक_कळवण_सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणून वाहन धारक या रस्त्याची निवड करतात,या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.या रहदारीला अर्धवट रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रोजच छोटे मोठे अपघात होऊन शाब्दिक चकमकी होत आहेत, त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या घर मालकांना रोजच कटकट सहन करावी लागत आहे.रस्त्यालगत असलेल्या घरांना धुळीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मुळे वाहन धारक व पिंपळदर वासियांमध्ये सदरील कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून संबंधित कंपनीस लवकर काम करण्यास सक्ती करावी, अन्यथा मोठे आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पिंपळदर वासियांतर्फे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here