पाचोरा शहरात सातचे आत घरात,नाहीतर पोलीस स्टेशनपर्यंत निघेल वरात

0

पाचोरा प्रतिनिधी विनोद हिंगमिरे दिनांक~१६/०३/२०२१पाचोरा शहरात आजपासून सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत सर्वच दुकाने बंद करण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद देत व्यापारीवर्ग, दुकानदार व व्यावसायिक बंधू काटेकोरपणे पालन करून सायंकाळी सात वाजता आपापली दुकाने बंद करुन योगदान देऊन कोरोनाच्या संघर्षमयी लढाईत सामील झाले असल्याचे दिसून येत आहे.पाचोरा शहरातील सर्व रहिवासी तसेच पोलीस प्रशासन मोलाची जबाबदारी पार पाडतांना दिसत आहे, तसेच पाचोरा नगरपालिकेतील कर्मचारी या नियमांचे पालन न करणाऱ्या बंडखोरांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.तसेच या बंदमध्ये मेडिकल, दूध, किराणा दुकान, दवाखाने, अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद करण्यात आले आहे.सायंकाळी सात तै सकाळी सात पर्यंतचा बंद यशस्वीपणे पाळण्यासाठी डी. वाय. एस. पी. भारत काकडे साहेब, पी.आय. नजन पाटील साहेब, पी. एस. आय, गणेश चौबे साहेब, राहुल पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, जगताप पाटील, बापू पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरपालिका कर्मचारी अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रशांत कंडारे, आदी अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here