आम्ही भुजबळांचे मतदार

0

⏰ *!!आम्ही भुजबळांचे मतदार!!* ⏰

सुषमा रामकृष्ण पैठणकर, येवला!अथांग अनुभवांचा सागर छगन भुजबळ..!!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….?!!नाशिक औरंगाबाद हायवेवर
गाव आहे आमदार भुजबळांचे
नाव आहे येवला त्याचे
आठवते का साहेब दिवस पहिल्या आमदारकीचे
कसे स्वागत केले होते
येवलेकरांनी तुमचे…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….?!!शेकडो किलोमिटर चा प्रवास करून
आपण येवल्यात आले
घेतली उमेदवारी रंगल्या सभा, आश्वासनांचा पाऊस पडला,पुणेगाव, दरसवाडी डोंगरगाव म्हणायला इथेच तर आपण शिकला…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले…..?!!आसाड, ओसाड, भकास गावचा नकाशा आपण बदलला
सुटला पाणी प्रश्न, लोड शेडिंग चे नाव नाही राहिले,
चार तासाचा प्रवास दोन तासावर आला
इतका इथे रस्त्यांचा विकास झाला
येवल्याचा जिर्णोद्धार केला…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….?!!कारावासाला आपण आनंदाने भोगलं तिथेही पत्रव्यवहाराने आम्हाला जोडलं,
नशीब बलवत्तर सोडणे भाग पडले न्यायदेवतेला,
विसरू नका साहेब ३ ऑक्टोबर २०१६ च्या त्या विराट मोर्चाला…!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….?!!सत्यशोधक वृत्तीला आपण मानतील,जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव लढतील,
ऊन,वारा,पाऊस आपण आमच्यासाठी सोसतील,
शाहु, फुले,आंबेडकर तरी या पेक्षा काय वेगळे असतील…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….!!खुप काही दिले साहेब आपण आम्हाला पण येवलेकर देखील कमी पडले नाही साथ द्यायला तुम्हाला, देशात गाजवला पैठणीचा माग
म्हणूनच तर म्हटलय आम्ही आपल्याला येवल्याचा वाघ…!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….!!साता समुद्रापार गेलेलं आभाळा एवढं नाव आहे आपलं,
मुंबईकरांनी ओळखलं,
नाशिकरांनी मानलं पण येवलकरांनी मात्र नाव आपल ह्रदयात कोरलं
यापुर्वी एवढं प्रेम तुम्ही तरी कुठं पाहिलं…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….!!अभिमान बाळगा साहेब
येवलेकरांचा
चौथ्यांदाही विधानसभेत मान राखलाय तुम्ही आमचा,
दिल्या शब्दांना आपण पाळले
गेली पंधरा वर्षे विश्वासाने आपण आम्हाला सांभाळले …
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….!!श्वास थांबतो पण विकास थांबत नसतो,अजून तर खुप काही करायच आहे साहेब आपल्याला
पण त्या आधी एकच मागणे आहे त्या ईश्वराला उदंड निरोगी आमचे ही आयुष्य लाभुदे देवा येवल्याच्या भाग्यविधात्याला…
!!आता तरी सांगा ना साहेब येवलेकर कसे वाटले….?!!आम्ही आपले मतदार
येवला.
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰शब्दरचना – सुषमा रामकृष्ण पैठणकर, येवला.९५६१५७२४९७,अन्न नागरी पुरवठा मंत्री,पालकमंत्री, नाशिक जिल्हा मा.ना. छगन भुजबळ साहेब यांच्या सेवेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here