जनजागृती सेवा समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न.

0

बदलापुर-कोरोनाचे संकट अजुन टळलेले नाही.शासनाच्या आदेशानुसार कोविड १९च्या नियमानुसार अंजलीनगर,हेंद्रेपाडा,बदलापुर(प)येथे जनजागृती सेवा समितीच्या वतीने घरगुती स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ.दीप्ती(प्रेरणा)गांवकर,सिटझन वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे,मंत्रालयातील निवृत्त अधिकारी व असोसिएशनचे जेष्ठ सल्लागार दीलीप नारकर,जनकल्याण सेवा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सचिन फळणे,उत्कर्ष सेवा मंडळाचे संस्थापक दीनेश भालेकर,ध्रुव अकॅडमिचे संस्थापक-संचालक महेश सावंत,समादेशक कमांडीग ऑफीसर मंगेश सावंत या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानाच्या मजु-यासहीत अभिवादन केले. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रती सर्वसमावेशक मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.उपस्थितांचे स्वागत कार्यकारिणी सदस्य सौ.भावना परब,दीपक वायंगणकर यांनी गुलाब पुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विराज जाळगांवकर,सौ.गंधाली तिरपणकर,दत्ता कडुलकर,सौ.भावना परब,दिपक वायंगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंती उत्सव घरगुती स्वरूपात पण उत्साहात संपन्न झाला.,धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here