उत्तम मानव तयार करण्याचे संस्था – नामदेवराव चापे

0

सिल्लोड प्रतिनिधी, विनोद हिंगमिरे – वारकरी शिक्षण संस्था, अध्यात्मिक शिक्षण संस्था संस्था म्हणजे खरा मानव निर्माण करण्याचे केंद्र होय.इतर शाळा व विद्यालयातून डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक , जिल्हाधिकारी तयार होतीलही परंतु माणव वृत्तीची व्यक्ती तयार होईलच याची शास्वती नाहीत. म्हणून अध्यात्मिक शिक्षण आज काळाची गरज आहे.असल्या संस्कार देणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था उभ्या राहिल्यास तुरुंग,न्यायालय, वृद्धाश्रम सारख्या यंत्रणवर येणार ताण कमी होईल असे मत सेवानिवृत्त प्राचार्य,प्रसिध्द व्याख्याते नामदेवराव चापे यांनी मूरडेश्वर-केळगाव येथील परम पूज्य ब्रम्हलीन काशीगिरी महाराज अध्यात्मिक शिक्षण संस्था शुभारंभ प्रसंगी मुरडेश्वर येथे केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्वच दान महत्वाचे परंतु ज्ञानदान हे सर्व स्रेष्ठ दान असून त्यातून जीवन जगण्याची वृत्ती दृढ होते. मूर्तीवर पुष्प अर्पण करूनच भक्ती होते असे नव्हे तर खरी भक्ती म्हणजेच ज्ञानदान कार्य होय. ज्ञानार्जन करिता एकांतवास,शांतता लागते आणी मूरडेश्वर येथे पर्वत रांगा, वृक्ष वेली व निसर्गाच्या सानिध्यात असल्याने विध्यार्थ्यांना खरे ज्ञान आत्मसात करता येईल परंतु विध्यार्थी घडविताना अर्थाजन म्हणून नव्हे तर भगवंत सेवा, आई वडील सेवा, वडील धाऱ्यांना सन्मान आदी बाबी विध्यार्थी वर्गात रुजाव्यात असेही ते म्हणाले. यावेळी मूरडेश्वर संस्थानचे महंत ओमकारगिरी,संस्था प्रमुख कृष्णा लहाने, सुखदेव सपकाळ, रायभान जाधव यांनी मनोगत व्यक्त करत संस्था स्थापन होऊन बळकटी मिळावी म्हणून विचार व्यक्त केले. यावेळी जगनाथ महाराज ,निवृत्ती महाराज बनकर, भिकन खेबडे, बाळू सपकाळ, श्री. काटकर, प्रशांत कापसे, कृष्णा सपकाळ, पंढरीनाथ दळवी, बद्रीनाथ पाटील, अर्जुन राठोड अध्यात्मिक संस्थेचे समाधान बसंते,प्रभू कदम यांनी संस्था स्थापनेचा हेतू मांडत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तर संचलन अमोल राजहंस यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here