मुंबई – भटक्या कुत्रीच्या अपघाती निधन प्रकरणामुळे होणारी मानहानी रहिवाश्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक त्याचबरोबर अर्वाच्य शिव्या हे कितपत योग्य आहे… असा सवाल केला आहे नालासोपारा येथील छेडा नगर मधील विनी हाईट सोसायटी मधिल स्थानिक रहिवाशी विजेँद्र पवार यांनी. सकाळी नेहमीप्रमाणे विजेँद्र पवार कामाला जायला निघाले कारण व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी दुसऱ्या शहरात जाणं आवश्यक होतं. पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन नियमितपणे गाडीत बसून कामाचा रस्ता धरला. डोक्यात कामासंबंधी विचार चालले असल्यामुळे आणि त्यांत नेहमीच्या जागी गाडी लावता न आल्याने गेटबाहेर यायला थोडा उशीरच झाला होता. रोजची कामं मार्गी लावून मिटिंग आटपेपर्यंत नवं रामायण विजेँद्रची वाट पाहत होतं. सकाळी सोसायटी बाहेर निघताना नेमकं एक भटक्या कुत्र्याचं पिल्लू विजेंद्रच्या गाडीखाली आलं आणि मृत पावलं. रस्ता खडबडीत असल्याने विजेँद्रला काहीच कळलं नाही. कुण्या एका विक्षिप्त बाईने विजेँद्र पवार यांची पोलिसात अशी काय तक्रार केली जसं काय त्याने एखाद्याचा खून केला की काय… इतकंच नव्हे तर या बाईने सोशल मिडीयावर सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी केली. सोबत अँनिमल राईटस् संघटना सामील झाल्याने गोंधळ आणखी वाढला होता. नक्की कोणत्या क्षणी कुत्र्याचं पिल्लू आपल्या गाडीखाली आलं ते विजेँद्र पवार यांना कळेना. जेव्हा त्यांनी स्वतः सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यातलं फूटेज पाहिलं. ते सर्व त्याच्या नजरचुकीने म्हणा किंवा अनावधानाने घडले असं त्या फुटेज मध्ये पाहताक्षणी आढळले. तरीही विजेँद्र पवार यांनी झाल्या प्रकाराची माफी मागून प्रकरण मिटवा अशी याचना देखील केली. या आधी सुद्धा विजेँद्र पवार यांनी भटक्या कुत्र्यांसदर्भात पालिकेत तक्रार केली होती पण पालिकेच्या थंड प्रतिसादामुळे कुत्र्यांची पैदास जास्तच वाढू लागली FIR दाखल झाल्यामुळे विजेँद्र पवार जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांच्यावर प्राणीहत्येचं कलम लावण्यात आलं होतं. शिवाय अपघाताला हत्येचा रंग देऊन सोशल मिडीयावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे त्याला शिव्याशाप देणारे फोन सुद्धा येऊ लागले होते. याचा परिणाम बराच तीव्र झाला. पोलिस स्टेशनच्या चकरा, त्यात गेलेला वेळ, बिघडलेलं रूटीन, पत्नी-मुलांची काळजी, कॅन्सल कराव्या लागलेल्या मिटींग्ज, त्यामुळे व्यावसायिक नुकसान तर झालंच शिवाय मानसिक त्रास झाला हा वेगळाच. केवळ बदनामी करून दुस-याला त्रास देणं हाच त्या बाईचा हेतू असावा हे निश्चित झालं. पण यामागचं कारण कळत नव्हतं. अनेकदा नकळत अपघात होतो पण त्याचा इतका बाऊ केला जातो की आपण फार मोठा अपराध केलाय. पण आपण जे काही पाहतो, वाचतो त्याची दुसरी बाजू माहित नसताना सहजपणे आपलं मत व्यक्त करून मोकळे होतो पण सत्य काय आहे याचा उलगडा न लावता एखाद्या निरपराध व्यक्तीची सोशल मीडियावर केलेली नाहक बदनामी हीं त्याच्या व्यवसायावर.. त्याच्या जनजीवनावर किती घातक ठरते हे या विक्षिप्त बाईला आणि तिला साथ देणाऱ्या विक्रुत प्रवृत्तीच्या लोकांना कसं समजणार. तेव्हा अशा प्रकारामुळे विजेँद्र सारखे अनेक युवक बळी पडताहेत त्याचं काय…! तेव्हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे.आभारी आहोत,विजेँद्र पवार
बी/६०३, विनी हाईट, छेडा नगर, नालासोपारा (पश्चिम)
९८९८८४७८७३,महेश्वर भिकाजी तेटांबे,(सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार) ९०८२२९३८६७