मुडैश्वर येथे चातुर्मास समाप्ती कार्यक्रम संपन्न

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) श्री.प.पु.ब्रम्हलीन काशिगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने श्री.पिठाचे पीठाधीश प.पु.ओंमकारगिरी महाराज यांचा चातुर्मास समाप्ती कार्यक्रम नुकताच सोमवार रोजी संपन्न झाला दरवर्षी चातुर्मासाचे आयोजन करण्यात येत असते त्याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते,चातुर्मास म्हणजे साधना करण्याचे दिवस पंढरपुर किंवा धार्मिक स्थळे करता आपण कोरोनामुळे पंढरपुर जाऊ शकलो नाही पण मुडैश्वर संस्थान या ठिकाणी साधना करणायासाठी आम्ही मुडैश्वर येथे साधना पुर्ण केली. मुडैश्वराची सेवा मनापासून करा आयुशात कमी पडणार नाही आई वडिलाची सेवा करा चांगल्या लोकाच्या संगतीत रहा जीवनात यशस्वी व्हाल जांत्यामुळे तुम्ही जग पाहिले त्यांना आयुशयभर अंतर देऊ नका असे प्रतिपादन ह.भ.प.समाधान महाराज रेलगावकर यांनी केले.याप्रसंगी मुडैश्वर संस्थानचे पीठाधीश ओमकागिरी महाराज,ह.भ.प वैजीनाथ महाराज, ह.भ.प समाधान महाजन रेलगाव,प्राचार्य नामदेव चापे सिल्लोड, वामन नाना, मानिक महाराज,पंढरी महाराज, ह.भ शेषराव महाराज प्रभु महाराज,जगन महाराज, बापु महाराज, परमेश्वर महाराज, पत्रकार राजु आप्पा हिंगमिरे आदींसह भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here