सिल्लोड ग्रामीण पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांनवर धडक कारवाई

0

सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमिरे ) मटका चालकावर कधी होणार कारवाई :अरुण चव्हाण,सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. याची दखल घेत पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्या विरोधात मोहीम छेडली आहे. आज केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी दारू चा माल जप्त करण्यात आला आहे.सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व मुंबई कल्याण मटक्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे .अवैध धंदे करणारे कोणालाही न जुमानता सारांशपणे आपले धंदे सुरू ठेवत आहे. याची दखल सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी घेत अवैध दारू विक्री त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज केलेल्या कारवाईत अन्वी या गावातील अवैध दारू विक्री त्यांच्याविरोधात कारवाई करून अवैध दारू जप्त करण्यात आली आहे यात पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे, विष्णू कोल्हे, संतोष घुनावत, निकाळजे, वाघोळे ,साळवे, फुलारे यांच्या पथकाने कारवाई करून आरोपी सुरेश गायकवाड व कैलास कांबळे दोघे राहणार अन्वी यांच्याकडून देशी दारूच्या ११० बाटल्या एकूण आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बॉक्स मध्ये घेणेअवैध दारू विक्री व मटका चालकावर कधी होणार कारवाई,सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरगाव फाटा येथील देशी दारूच्या दुकाना लगत व भोकरदन रस्त्यावरील वरुड पिंपरी फाट्यावर असलेल्या काही हॉटेल च्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात मुंबई, कल्याण मटका व अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. त्यांच्यावर देखील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करावी जेणेकरून या भागातील तरुण मटका व दारू या व्यसनाच्या अधीन जाणार नाही व सर्वसामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर पडणार नाही तरी अशा अवैध धंदे चालकावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे झाले आहे.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाअध्यक्ष अरुण चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here