औरंगाबाद प्रतिनिधी- विनोद हिंगमिरे
सेल्फी काढण्याच्या नादात कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात पडून २१ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला.
शनिवार ही घटना घडली आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली यात गीता शंकर जाधव वय २१ वर्षे राहणार नेवासा या विवाहितेचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. गीता शंकर जाधव ही आपल्या भावासह नेवासा येथे आपल्या सासरी जात होती.
औरंगाबाद ते नेवासा मार्गात कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून जाताना गीता हिस फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.तीने फोटो घेण्यासाठी भावाला थांबविले व पुलावर फोटो काढले या वेळी पुलाच्या काठड्या जवळ सेल्फी घेताना तिचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली, उपस्थितांनी तात्काळ धावपळ करून तिला पाण्याबाहेर काढले व उपजिल्हा रुग्णालयात हलविले या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. ८ महिने आगोदरच गीता हिचा औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता सर्व काही व्यवस्थित सुरू असताना काळाने अचानक घाला घातल्याने खैरे व राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृत देह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.