दोन कारच्या भीषण अपघातात तिघे जखमी सिल्लोड- कन्नड मार्गावर दुभाजक नसल्याने वाढले अपघाताचे प्रमाण

0

सिल्लोड ( प्रतिनिधी-विनोद हिंगमिरे) सिल्लोड कन्नड रस्त्यावर नाचनवेल येथील चौफुलीवर दोन कारचा भीषण अपघात झाला. काल सात वाजेच्या दरम्यान घडली रेखा राजू नेटके वय- 43 (अंधेरी, मुंबई) प्रियंका राजू नेटके वय-22 रमेश साखला वय- 70 भराडी ता.सिल्लोड हे सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील महावीर साडी सेंटर येथील कापड व्यावसायिक रमेश साखला हे आपल्या महिंद्रा गाडीने ( MH.20.EE.5937 )या वाहनाने नाशिक येथील नातेवाईक यांच्या अंत्यविधीला जात असताना चौफुलीवर अंधेरी मुंबई कडून शेलगाव कडे जाणारी कार( MH.02.BZ.2106 ) शेलगाव येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असताना यांच्यात चौफुलीवर जोरदार धडक झाली. सकाळची वेळ असल्यामुळे दूधवाल्या शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले मात्र महिला व मुलींना जास्त मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले येथे चौफुली रस्ता असल्यामुळे चारही बाजूला दुभाजक नसल्यामुळे हा अपघात घडला. असल्याचे नागरिकांनी सांगितले येथे दुभाजक बसविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी वाहनधारक व नागरिकांनी केली आहे. अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हा अपघात इतका भयानक होता.कि दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिशोर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गाडेकर अंमलदार शिवदास वसंत पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here