
प्रतिनिधी ( विनोद हिंगमिरेसि ) ल्लोड तालुक्यातील वडाळा या गावाला तलाठी सजाअसूनसूध्दा ह्या गावातील नागरिकांना तलाठ्यांच्या सहीसाठी चकरा माराव्या लागत आहे.सध्या सगळीकडे मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी पंप योजना, एकूण जमिनीचा दाखला, (सातबारा) व शासनाच्या विविध योजनांचे कामे प्रगती पथावर चालू आहे. मात्र या योजनांच्या कागदपत्रावर तलाठ्यांच्या सहीसाठी शेतकऱ्यांना बार बार हातातील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत विशेष बाब म्हणजे वडाळा या गावाला गेल्या तिन-चार महिन्यापूर्वी तलाठी नसल्यामुळे तात्पुरत्या कामासाठी नेमून दिलेल्या तलाठी हे बाहेर गावाला( औरंगाबाद )ला राहत असल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. सध्या कोरणा-या महामारीने संपूर्ण देश हैराण झालेला असताना नूकतेच लॉक डाऊन खुले करण्यात आले आहे.असे असले तरी सुद्धा शेतकऱ्यांना साध्या सहीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. गावाला तात्पुरते नेमून दिलेले तलाठी यांना वारंवार फोन करून सुद्धा प्रतिसाद मिळत नाहीत. एखाद्या वेळेस जर फोन उचलला तर आॅफिसला उद्या येणार आहेत परवा येणार आहेत.प्रिंटर खराब आहे.नेटवर्कमध्ये प्राॅब्लेम आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे तलाठी यांच्याकडून मिळत आहेत.त्वरित वडाळा सजेसाठी तलाठी उपलब्ध करून देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाच्या विवीध योजनांचा लाभ घेता येईल व तलाठी हा सजेच्या ठिकाणीच वास्तव्यास असावा. अशी मागणी वडाळा येथील संतप्त नागरिकांनी केली आहे.
