परळीत धनंजय मुंडेंच्या कार्यालयात प्रथमच दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम संपन्न

0

परळी- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय (शुक्रवार व शनिवार) दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम ना. मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ना. मुंडे यांनी परळी व परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी फराळाचेही आयोजन ना. मुंडे यांच्या वतीने केले होते.दरम्यान शुक्रवार व शनिवार असे दोनही दिवस सायंकाळी आयोजित या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत या प्रकारचा दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपण यापुढे दरवर्षी आयोजित करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोरोना विषयक खबरदारी घेण्याचेही परळीकरांना आवाहन केले, तसेच परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ना. मुंडे म्हणाले. परळी शहर व तालुका अशा दोन टप्प्यात आयोजिलेल्या या कार्यक्रमास परळीसह व जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आपल्या नेतृत्वास शुभेच्छा देवाण-घेवाण केले. धनंजय मुंडे यांनी आलेल्या प्रत्येक व्यक्तीस व्यक्तिशः भेटून यावेळी शुभेच्छा दिल्या! यावेळी उपस्थित नागरिकांना ना. धनंजय मुंडे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. परळी मतदारसंघ देशभरात नावाजला जावा, आपण परळीचे आहोत, हे अभिमानाने सांगता यावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून, राज्य सरकारच्या माध्यमातून परळी मतदारसंघात अविस्मरणीय असे बदल घडविण्याचे आपले स्वप्न असल्याचे ना. मुंडे यांनी अधोरेखित केले. तसेच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक शब्दावर आपण ठाम असून, त्यांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ना. मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here