
डोंबिवली-कोरोना महामारीमुळे अनेक ठीकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्या रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान.हीच सामाजिक बांधिलकी समजुन पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षा सौ.श्रुती उरणकर आपला वाढदिवस डोंबिवली येथील चिदानंद ब्लड बॅक मध्ये रक्तदान करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. श्रुती उरणकर म्हणजे प्रत्येक वाढदिवस सामाजिक कार्याची जोड देऊन केलेला उत्सव असतो.अनेक सामाजिक संस्थांनमध्ये कार्यरत असणा-या श्रुती ताईंनी रक्तदान आणि मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या रक्तदानादीवशी रक्तमित्र माहीर देसाई यांनी रक्तदान करुन श्रुती उरणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दील्या. रक्तदान केल्यानंतर तेथेच केक कापुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. अशोक म्हात्रे, सचिव डाॅ.वैभव पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव,पत्रकार उत्कर्ष समितीचे कोकण उपाध्यक्ष व जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, महाराष्ट्र रोशनी न्यूजचे उप संपादक शैलेश सणस हे उपस्थित होते. या वाढदिवस सोहळ्यात श्रुती उरणकर यांचे कुटुंबिय,पत्रकार उत्कर्ष समिती,महिला उत्कर्ष समिती,जनजागृती सेवा समिती, ग्लोबल मालवणी संस्था यांच्या पदाधिका-यांनी वेळ देऊन वाढदिवस यादगार बनविला.
