सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिर) केळगाव मुर्डेश्वर मंदिर परिसरात माळरानावर कास पठार योजनेअंतर्गत रानफुलांच्या बिया व जमा करण्यासाठी माननीय गटशिक्षणाधिकारी सिरसाठ साहेब साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व केंद्रप्रमुख श्री कुंभारे सर यांच्या अध्यक्षतेखाली आमठाणा केंद्रातील शिक्षक व केरहाळा केंद्रातील रानफुलाची पुरेपूर माहिती असलेले श्री कृष्णा बडक सर, श्री पुरी सर, श्री बोराडे सर, श्री तडवी सर,केळगाव, श्री जाधव सर, श्री मिसाळ सर, श्री बनसोड सर,श्री दाभाडे सर, श्री यादव सर, श्री शिंदे सर, श्री चाटे सर, व केळगाव परिसर वनरक्षक या सर्वांनी रानफुला बिया जमा करण्याच्या कामी सहकार्य केले. अनेक प्रजातींच्या रानफुलांच्या बिया जमा करण्यासाठी सर्वांनी सकाळी 11 वाजता मुरडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये भेट दिली व दुपारपर्यंत विविध प्रकारच्या रानफुलांच्या बिया जमा करण्यात आल्या, व त्यानंतर मंदिरामध्ये दैनिक देशोन्नती श्री राजु आप्पा हिंगमिरे गणेश ईवरे(पाटील) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकाळ वाडी येथील मॅडम श्रीमती कोल्हे मॅडम यांच्या तर्फे वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मंदिराच्या परिसरात सर्वांनी एकत्रितपणे वनभोजनाचा आस्वाद घेतला.
अशाप्रकारे सर्वांनी मिळून आनंद पूर्ण वातावरणात आजच्या या रानफुले जमा करण्याच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home Breaking News केळगाव मुर्डेश्वर मंदिर परिसरात माळरानावर कास पठार योजनेअंतर्गत रानफुलांच्या बिया व जमा