अपहरणाचा प्रयत्न करुन गोळ्या झाडून फरार झालेले आरोपी जेरबंद

0

प्रतिनिधी ( विनोद  हिंगमिरे ) औरंगाबाद ग्रामीण ५० लाखाची खंडणी उकळण्यासाठी व्यापाऱ्याचे अपहरणाचा प्रयत्न करुन गोळ्या झाडून फरार झालेले आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व अजिंठा पोलीसांची कामगिरी दिनांक ०८/११/२०२० रोजी फिर्यादी नामे अखिलेश सुधीर गुप्ता वय ४५ वर्ष , व्यवसाय- शेती व व्यापार रा . शिवना ता . सिल्लोड जि . औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे अजिठा येथे फिर्याद दिली की , दिनांक ०८/११/२०२० रोजी मी नेहमी प्रमाणे शेतातील काम आटोपुन सायंकाळी सहा वाजेचे सुमारास माझी कार क्रमांक एम.एच .१ ९ – ए.ई -६२८६ मध्ये माझ्या सोबतच्या लोकांसोबत बसुन घरी जाण्यासाठी निघालो असता शेतापासुन थोडे अंतर पुढे गेल्यावर तिन अनोळखी इसमांनी माझ्या गाडीला हाताने गाडी थांबविण्याचा इशारा केल्याने मी गाडी थांबविल्यानंतर त्या इसमांनी गाडीत बसलेल्या लोकांना जबरीने खाली उतरविले व मला गाडीतून खाली उतरण्यास सांगुन मला दम देऊन गाडीच्या पाठीमागील सिटवर बसायला सांगितले मी गाडीच्या मागच्या सिटवर जाऊन बसु लागलो त्यांचेपैकी एकाने मला गाडीत दाबण्याचा प्रयत्न केला व एकाचे हातात पिस्टल होते ते मला गाडीतून पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी मी त्यांना प्रतिकार केल्याने त्यांनी तिन वेळा पिस्टल फायर केली गोळीबाराचा आवाज ऐकुन आसपासच्या शेतातील लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी मला तेथेच सोडून पळ काढला , वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे अजिंठा येथे गु.र.नं २१४/२०२० कलम ३४१ , ३६४ , ५११ , ३४ भा.दं.वि सहकलम ३ , २५ भा.ह.का प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाची माहिती मिळताच मा . पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळास अजिंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करुन सदर गुन्हयाच्या अनुषंगाने त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारच्या आधारे व तांत्रीक विश्लेषानावरुन माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा ( १ ) कृष्णा माणीक काळे वय २३ वर्ष रा . शिवना ता . सिल्लोड यांने त्याचे साथीदारासह केला असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाल्याने नमुद आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता नमुद आरोपीने सांगितले की , अखिलेश सुधीर गुप्ता यांचे नातेवाईकांकडून ५०,०००,०० / – ( पन्नास लाख ) रुपये खंडणी उकळण्याच्या उद्येशाने त्याने त्याचे साथीदार नामे ( २ ) सागर संतोष सोनुने वय २८ वर्ष रा . आडगांव भोंबे ता . भोकरदन , ( ३ ) वैभव गणेश कालविले रा . नाटवी ता . सिल्लोड जि . औरंगाबाद व ( ४ ) सचिन चिंटू सोनवणे वय वर्ष रा . कांचन नगर , जळगांव जि . जळगांव यांचेसोबत कट रचुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आ.क्रं . ०१ व ०२ यांना अजिंठा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांचे नमुद पत्त्यावरुन व आरोपी क्रमांक ०३ व ०४ यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून गुन्हयांत वापरलेली पिस्टल , ०१ जिवंत काडतूस , मोटार सायकल व ०३ मोबाईल हँडसेट असा एकुण १,०१,००० / – रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील , प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी , उप विभाग , सिल्लोड श्री . विशाल नेहूल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुदे , सहा . पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकुर , पोलीस उप निरिक्षक , संदीप सोळंके पोहेकॉ बालू पाथ्रीकर , नामदेव शिरसाठ , विक्रम देशमुख , राजेंद्र जोशी , पोना संजय भोसले , उमेश बकले , योगेश तरमाळे , पोकॉ बाबा नवले , ज्ञानेश्वर मेटे , जिवन घोलप , संजय तांदळे , व अजिंठा पोलीस ठाण्याचे पोह अक्रम पठाण , आबासाहेब आव्हाड , निलेश शिरसकर पोना,रविकिरण भारती यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here