वीजचोरी म्हणजेच सततच्या ग्राहकांवर अन्याय –

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) वीजचोरी म्हणजेच सततच्या ग्राहकांवर अन्याय –उपकार्यकारी अभियंते बनसोडे प्रतिपादन भराडी,अनधिकृत वीज वापरने म्हणजेच अधिकृत वीज ग्राहकांवर अन्याय होत असल्याचे मत नवनिर्वाचित उपकार्यकारी अभियंता एस. बनसोडे यांनी व्यक्त केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, रीतसर फिस भरून वीज जोडणी, सातत्याने वीजबिल भरणे आदी बाबी महावितरणला साहाय्य करणाऱ्या आहेत. परंतु वेगवेगळ्या प्रकारे वीज चोरी केल्याने अतिरिक्त बोझा रोहित्रावर येऊन रोहित्र खराब होऊन, जळून वीज पुरवठा खंडित होतो. आणी म्हणूनच मुख्य अभियंता श्री. खंदारे, अधीक्षक अभियंते आकोडे कार्यकारी अभियंते श्री. शिकणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातीलआमचे अभियंते व त्यांचे पथक वीज चोरी कारनाराविरुद्ध कडक मोहीम राबवित आहेत. पथकाने पिंपळ घाट, शिरसाळा,सिसारखेडा,वडोधचाथा,पळशी, केऱ्हाळा आदी ठिकाणी भराडी येथील महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री. प्रदीप निकम ,अंबादास साखरे, शेषराव सपकाळ, विजय पाडळ,शेख निसार, शेख साबेर,नामदेव राकडे, एस.आर.आहेर, दत्ता गोराडे, डी. आर. पांढरे, गणेश जाधव, एस .एस. कांबळे, रीजवान पठाण, समाधान फुले,सौरभ नारळे,अफरोज सय्यद, श्री.काकडे,श्री.शिंदे,श्री.ताठे यांनी 100 विजचोर पकडले. याबाबत श्री. निकम म्हणाले की, वीज ग्राहकांनी कॅपिसेटर बसवावे,ऑटोस्टटर बसवल्याने रोहित्रवर लोड येऊन डीपी फेल होते व वीजपुरवठा खंडित होतो. म्हणून स्वयंचलित स्टाटर बसवू नये. अधिकृत वीज जोडणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here