पळशी येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू,तसेच खातखेडा येथे २० वर्षीय परप्रांतीय युवकाचा मृत्यू ,तसेच परिसरातील शेतकऱ्याच्या दोन गायी ठार…! या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त

0

सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील पळशी सह परिसरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चार ठिकाणी विज पडल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन गायी दगावल्या. यात पळशी येथे विज पडून शेतात काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा, तर खातखेडा येथे मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेश येथील एका २० वर्षीय तरुणाचा समावेश आहे.कांताबाई गंगाधर सोनवणे (४२ रा. पळशी) व सोविन दिनेश जामरे (२०) रा. डोंगर चिंचोली, जि. खरगोन मध्य प्रदेश) असे विज पडून मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पळशीसह परिसरात अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात पळशी येथे श्री लक्ष्मी देवी मंदिराजवळ विज पडल्याने कांताबाई सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत होत्या. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्याने त्या शेतातील घरी परत जात असतांना विज कोसळली. त्यांना शेजारील नागरिकांनी तात्काळ धाव घेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत तालुक्यातील खातखेडा येथे विज पडल्याने मध्य प्रदेश येथील तरुणाचा मृत्यू झाला. येथे मध्य प्रदेश मधील पंधरा- वीस मजुर मजुरीसाठी आलेले आहे. दुपारी हे मंजूर कापूस वेचणीचे काम करीत असतांना पाऊस सुरु झाला. यामुळे सर्व मंजुर गावाकडे परत येत होते. या दरम्यान विज पडली व यात सोविन जामरेचा यात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घाव घेत तात्काळ मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.या वेळी दोन गायी दगावल्या,पळशी येथे पूर्णानदीजवळ वीज पडली यात अल्पभूधारक शेतकरी गणेश बळे या शेतकऱ्याची गाय दगावली,दरम्यान  टाकळी खुर्द येथे ही गावाशेजारी विज पडली. यात परवेज ईसाक पठाण या शेतकऱ्याची गाय दगावली. सध्या ग्रामीण भागात कापूस वेचणीचे तसेच रबी पेरणीची लगभग सुरु आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुर तसेच शाळा बंद असल्याने विद्यार्थी ही कापूस वेचणीचे काम करीत आहे. त्यात एकाच दिवशी परिसरात चार ठिकाणी विज पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून माहिलेच्या कुंटुबाचे सांत्वन करन्यात आले,महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पळशी येथील सोनवणे कुंटुबाची भेट घेतली व सांत्वन केले,व ही घटना अचानक घडल्याने मी खूप दुःखी आहे व मी तुमच्या दुःखात सहभागी आहे व तसेच मी शासन तर्फे आपणांस आर्थिक मदत प्राप्त करून लवकरात लवकर मी  तुमच्याकडे घेऊन येईल असे तोंडी आश्वासन यांवेळी मंत्री सत्तार यांनी दिले….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here