साध्या पद्धतीने साजरा होणार नवरात्र उत्सव जोगेश्वरी मंदिर समितीचा निर्णय

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा जवळील सागमाळ शिवाराच्या डोंगरकुशीत वसलेल्या कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेल्या ची माहिती संस्थानाचे अध्यक्ष पुंडलिक राव मोरे व सांडू आप्पा कोठाळे यांनी दिली घटस्थापना शनिवार शनिवार दिनांक 17.10 असून रोजी होत असून 25 ऑक्टोंबर ला विजयादशमी आहे या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम भक्ता विना होणार आहेत दरवर्षी अतिउत्साह मध्ये साजरा होणारा जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव यंदा कोरणा च्या पार्श्वभूमीवर प्रथमच साध्या व सरळ पद्धतीने व भाविकांना शिवाय साजरा करण्याची वेळ स्थानावर आली आहे गेल्या सहा महिन्यापासून मंदिर बंद आहे त्यामुळे मंदिराला मिळणाऱ्या देणग्या तही घट झाली आहे ही बंद आहे त्यामुळे मंदिर परिसरात छोट्या-मोठ्या दुकानदारांवर ही उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी या वर्षी आपापल्या घरीच देवीची आराधना करावी व शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी भाविकांनी घ्यावी तसेच नवरात्र उत्सव देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरावर भाविकांनी येऊ नये असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंडलिक राव मोरे सांडू आप्पा कोठाळे सकाराम नागरे कृष्णा मोरे सुनील मोठे प्रकाश बारस्कर सुरेश सिंग बिसेन माधवराव तायडे व आदि संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here