वारंवार नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे वडाळा येथे मोबाईल टॉवरची मागणी

0

प्रतिनिधी ( विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वडाळा सह परिसरात सतत नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वडाळा हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाच्या परिसरात सुद्धा शेतामध्ये व वाड्या-वस्त्यांवर लोक राहतात परंतु वडाळा परिसरात एकही मोबाईल टॉवरच नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एका सिम कार्डधारकाला तीन महिन्याचे बॅलन्स मारण्यासाठी सहाशे रुपये इतका खर्च येत आहे. आणि त्यातून असा नेटवर्कचा सतत प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये केलेले रिचार्ज हे तसेच वाया जात आहे. वडाळा येथून भराडी येथील टॉवरचे अंतर हे सात किलोमीटर आहे आणि अंभई येथील टॉवरचे अंतर हे सहा किलोमीटरचे आहे. त्यामुळे सतत नेटवर्क चा प्रॉब्लेम या परिसरात येत आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून वडाळा येथे टॉवर बसवण्याची मागणी येथील नागरिकांनी केलेली होती. परंतु या मागणीचे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सतत नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे मोबाईल कंपन्यांनी वडाळा परिसरात मोबाईल टॉवर बसवण्यात यावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत नेटवर्क चा प्रॉब्लेम येणार नाही.व कोणताही त्रास होणार नाही अशी मागणी वडाळा सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here