
माझे खरे मार्गदर्शक सद् गुरु के प्रमोद आर्टिस्ट….भले देऊ सज्जना ….कासेची लंगोटी…. नाठाळाच्या माथी…..माणुसकी काठीह्या सद् गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे ज्यानी आपले जीवन स्वाभिमानाने जगुन शेवट पर्यंत कलेला समर्पित करणारा रंग,रेषा,आकार यांवर आपल्या हातांनी जादु करणारा कलाकार काल १६ आॅक्टो २०२०रोजी एक औलिया कलाकाराने ह्या क्षणभंगुर जगाचा निरोप दर्श अमावस्येला घेतला.चित्रकार के.प्रमोद ८०वर्षापुर्वी यांचा जन्म एका मध्यम वर्गीय वडिल केशवराव खैरनार यांच्या घरी झाला.केशवराव हे मुळचे खान्देशातील साक्रीकडचे धनिक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या केशवराव स्वाभिमानी व भाऊबंदकी चा वाद सोडून स्वताच्या कर्तुत्व मालेगावी मेहतागिरी करुन व बाहेर गावी वसुलीचे काम अतिशय विश्वासाचे व जिकरीचे काम करून कुटुंब निर्वाह केला.के .प्रमोद लहान असताना तत्कालीन शरयू इंग्लीश स्कुल …काकाणी विद्यालय किल्ला येथे शिकले.कलाशिक्षक चिटणीस सर,, नानासाहेब रहाळकर सर,गुप्ते सर,हमाकु,वराकु सरांनी कलेचे व इतर संस्कार घडविले.चाणाक्ष प्रमोद यांनी सर्व कला आणि विद्या हस्तगत केल्या. डीटीसी धुळे स्कुल ऑफ आर्ट्स लालबाग तर या काळात प्रथम नंबर पटकावला.नाशिकचे आर्ट डायरेक्टर बाबुभाई मन्सुरी यांना गुरु केले व मालेगाव येथे उत्कुर्ष्ठ दर्जाचे चित्रकार व शिल्पकार बनले. पुढे मुंबई येथे सर्व कष्टाने जी बी आर्ट केले.गणपती कारखाना येथे रात्र पहाटे कामं केली मुंबई येथे केली.फिल्मसिटी बॅनर्स ची कामे केली.तदनंतर मालेगाव येथे पेन्टीगं क्षेत्रात नंबर वन म्हणून काम केली. भगवंत व्यायाम शाळेचे बापु सद्स्य होते. प्रत्येक वर्षी डेकोरेशन पौराणिक कथांवर आधारित शिल्पे पीओपी चे करत वनंबर मिळवत.माझ्यासारखे असंख्य कलाकार या गुरुमाऊली ने विना भेदभाव घडविले.हरिष खैरनार ओझर मीग पेन्टर,मी स्वत: एम्. केदार… विश्वास पेंन्टर…नन्दु सोनवणे,एम के राज,आझाद पेन्टर असे अनेकांना घडविले.सात्त्विक आहार आणि शुद्ध अंतःकरण व वाणी…. मुद्देसूद मांडणी, रात्रभर जागून कामे करणे,हत्तीछाप विडी,गौरी तुपे इ.मोठमोठी कामे करुन प्रितम,प्रेम, प्रविण,प्रिया यांच्यावर संस्कार शिस्त,शिक्षण देवुन उच्च शिक्षित केले.दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती….!Fame is the food that dead man eats….मरावे परी किर्ती रुपी मागे उरावे…आम्हा सर्व चित्रकार व कला शिक्षक यांना काकांनी अनेक स्पर्धा , प्रदर्शनांमध्ये अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केले व मालेगाव घडविले.बापू आपण लिवो नार्दो थी वींची पेक्षा कमी नाहीत.आम्ही आपणास व आपल्या कार्यास विसरूच शकत नाहीत.सद् गुरु तुमचे थोर उपकार…. गुरू पत्नी उषा काकुनी सुद्धा जीवनभर साथ दिली…आपण सुद्धा बापुंच्या पुण्याचे खरे वाटेकरी आहात…..आपल्या स्मृती निमित्त आम्ही कलाकार काहीतरी निश्चित करु….!!हा कलाया विमुक्तये….💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐👌🏿🌹🌷
