हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची मागणी!

0

मनमाड -हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची मागणी! मनमाड येथील बहुजन युवक संघातर्फे हाथरस उत्तर प्रदेश येथील बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी उचित कार्यवाही होण्यासाठी मंडळ अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलींवर काही नराधमांनी अपाशवी बलात्कार करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले,या जीवन संघर्षात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत्यू नंतर देखील तीची अवेहलना थांबली नाही,तिचा अंत्यविधी देखील तिच्या परिवाराला पार पाडता आला नाही. सदर अमानवी अत्याचाराचा आम्ही लोकशाही मार्गाने जळजळीत निषेध करित आहोत असे नमूद आहे,सदर घटना देशाला काळीमा फासणारी असून सदर गंभीर गुन्ह्या बाबतीत संबधीत राज्याची कायदा आणि व्यवस्था सवेंदनशील दिसत नाही.आम्ही महाराष्ट्र राज्यातील देशाचे सविंधान प्रेमी नागरिक आपणास विनंती करीत आहोत सदर मानवतेच्या गुन्हेगारांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याकामी आमच्या भावना संबधीत राज्य प्रशासनाला कळविण्यात याव्यात.तसेच पीडिताचा अंत्यविधीचा सोपस्कार परिवाराला पाडू न देण्यासाठी संबधीत प्रशासनाची चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करीत आहोत. त्यांच्यावर सदर विषय अत्यंत गंभीर असून महिला अत्याचाराबाबत केंद्र सरकारने व महाराष्ट्र राज्याने अति कठोर कायदे करण्याची गरज आहे.सदर निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की महिला अत्याचाराच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे चालविण्यात येऊन आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी भरीव प्रयत्न करणे गरजेचे आहे.आशा गुन्हाच्या तपासासाठी विशेष पोलीस दल गठीत करण्यात यावे जे राज्य मंत्रिमंडळाच्या गृह,सामाजिक न्याय आणि महिला व बालविकास खात्याच्या अधीन राहून कार्य करून शकेन!

तरीही आपणास विनंती आहे सदर निवेदनातील आशय गंभीरतेने घेऊन कार्यवाही करावी! असे निवेदन म्हटले आहे.
या वेळी सतीषभाऊ केदारे, प्रवीण आहिरे ,प्रदीप गायकवाड राजु पवार (वाल्मिकी नवयुग संघ, मनमाड), अनिल मायर(बहुजन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, मनमाड), फिरोज शेख, (कार्याध्यक्ष, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंच),संदीप पगारे,सिद्धार्थ जोगदंड,अर्जुन बागुल, सुनिल सोनवणे,सागर गरुड, कल्याण धिवर,सचिन इंगळे,विनोद खरे,किरण आहिरे,रमेश पगारे,विजय गेडाम, फकिरा सोनवणे,सागर साळवे, हर्षल सुर्यवंशी,अजित जगताप, राहुल केदारे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here