
सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील घांटनाद्रा येथील महाराष्ट्र ग्रामिण बॅक मॅनेजर शेतकर्यांना पीक कर्ज वाटपासाठी टाळाटाळ करीत आहे.
सिल्लोड संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी सिल्लोड तहसील कार्यालयात श्री.संजय कुलकर्णी यांच्याकडे निवेदन दिले असून सिल्लोड तालुक्यातील घांटनाद्रा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक अधिकारी शेतकर्यांना पिक कर्जासाठी अडवणूक करीत आहे शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन न करता अपमानास्पद वागणुक देत आहे तसेच अनाअवश्यक कागद पत्राची मागणी करुन पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यास उडवा उडवीचे उत्तरे करीत आहे
श्री.संजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात हे नमूद केले आहे यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय पवार,तालुका उपअध्यक्ष दादाराव पांढरे,उत्तमराव ताठे आदींसह कार्येकते उपस्थित होते.
