अनाड रोडवरील देशी दारु दुकानाचे बांधकाम बंद करण्याची मागणी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाजवळची असलेल्या अनाड रोडवर देशी दारु दुकानाचे बांधकाम सुरु असल्याने त्वरीत त्याची परवानगी नाकारुन सदरील दुकानाचे बांधकाम बंद करण्याची मागणी अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र भटका जोशी समाज समिती, क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद ग्रामपंचायत कार्यालय अनाड व अनाड गावचे भूमिपुत्र माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अनाड रोडवर रहदारीच्या व लोकवस्तीच्या रस्त्यालगत, आणि ज्या रस्त्यानी शालेय विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात जातात त्या रस्त्यावर देशी दारु दुकानाचे बांधकाम सुरु झाल्याचे नागरिकांना माहीत झाले आहे सदरील रस्ता अजिंठा बाजारपेठेचा मुख्य रस्ता असल्या कारणाने अनाड गावातील महिला व विद्यार्थी सुद्धा याच रस्त्याने वावरत असतात. म्हणून दुकान सुरु झाल्यास अनेक गरिबांची कुटुंबे उध्वस्त होऊ शकतात आणि त्यांतच अनाड हे गाव महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची जन्मभूमी असल्याने अत्यंत धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे गाव असून १५ वर्षांपासून गावात दारूबंदी आहे. गावातील संत-महात्म्यांसहित सर्व गावकऱ्यांनी अथक परिश्रमातून गाव व्यसनमुक्त केले आहे म्हणून सदरील देशी दारुचे दुकान अनाड रोडवर परवडणारे नाही. त्यामुळे हे दुकान इतर ठिकाणी हटविण्यात यावे अशी विनंती सर्व अनाड वाशीयांनी अजिंठा ग्रामपंचायत यांना व अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र भटका जोशी समाज समिती, माजी खासदार उत्तम सिंह पवार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून या लेखी निवेदनावर गावातील सर्व नागरिकांच्या व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here