खरेदी-विक्री मधून जनतेची आर्थिक लुबाडणूक सुरू

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे) सिल्लोड शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा वावर वाढल्याने शेती प्लॉट अथवा इतर खरेदी-विक्री मधून जनतेची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे याबाबत वरिष्ठ कार्यालयाने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहे
सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसभर दलालांचा वेळ का असतो याठिकाणी सिल्लोड शहर व तालुक्यातील शेती अथवा प्लाट घरे याबाबतचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन या ठिकाणी नोंद केल्या जाते परंतु मागील काही दिवसांपासून या कार्यालयात दलालांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी या दालनाची हात मिळवणी करून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लुबाडणूक करीत आहेत यामुळे अनेक नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे या कार्यालयात काही जरा मागील अनेक वर्षांपासून स्वतः अधिकारी असल्यासारखे वावरत असतात अडलेल्या नडलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची कारणे दाखवून खरेदी-विक्री व्यवहारात त्यांची लूट करणे दिवसाढवळ्या सुरू आहे याबाबत अनेक नागरिकांनी या कार्यालयाची वरिष्ठांकडे तक्रार केली तरीही या तक्रारीकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही परिणामी अशा दलालांचे व अधिकाऱ्यांचे चांगलेच फावलेले दिसत आहे अशा या लोकाची लुबाडणूक सुरू असलेल्या कार्यालयाकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज असून जनतेची लूट थांबवावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे ,या कार्यालयातील दलालांना आळा बसल्यास सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबेल या ठिकाणी होणारी अनेक बोगस कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोधावी म्हणजे नागरिकांची फसवणूक होणार नाही.
सुधाकर सोनवणे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here