सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे किन्ही परिसरात जया प्रमोद अल्लाट या दहा वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शनिवार(दि.२६) रोजी घडली सदरी घटना असे की आई वडील शेतात काम करायला गेले असताना चिमुकली घरी खेळत होती. घर शेत वस्तीवर असल्याने अजुबाजुला झाडेझुपे होती चिमुकलीला खेळत असतांना केंव्हा सर्पदंश झाला कळलेच नाही. आई-वडील घरी आले असता,त्यांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत पाहून भांबावून गेले भांबावलेल्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी अजिंठा येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, औषधी उपचार अपुरा असल्याने त्यांनी सिल्लोड येथे जाण्याचा सल्ला दिला या हेळसांडामध्ये चिमुकलीचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.सिल्लोड येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले उत्तरीय तपासणी करून रविवारी चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.