नांदगाव -: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे (उबाठा ) तालुका समन्व्यक संतोष लहिरे व शिवसैनिकांनी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत (शिंदे गट ) जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार श्री. कांदे यांच्या देवाज या निवासस्थानी आमदार सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार,राजेंद्र देशमुख,धनंजय कांदे,प्रमोद भाबड,सागर हिरे,प्रकाश शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. प्रवेशकर्त्या संतोष लहिरे यांच्यासह दत्तात्रय कटके, निवृत्ती बरशीले, किरण निकम,अरुण ढगे, गोरख बरशीले, रमेश लहिरे, यशवंत मडके, अमोल मडके, नारायण मडके, संजय लहिरे, नितीन आहेर, विनोद सोनावणे, आकाश आहेर, सार्थक लहिरे, विकास घोरपडे, अरुण ढगे, यांचा समावेश होता.विधानसभा निवडणूक जाहीर होताच उबाठा गटाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
Home Breaking News विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे (उबाठा ) तालुका समन्व्यक संतोष लहिरे व शिवसैनिकांनी...