
सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.राजेश पालकर यांनी प्रतिमेचे पूजन करून गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.तसेच आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो हे ही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.पालकर यांच्यासमवेत सलीम खान,साजिद पटेल, ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,कर्मचारी यांची उपस्थिती होती.
