अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे

0

सिल्लोड(  प्रतिनिधी:-विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यात सुरू असलेले मटका अवैध दारूविक्री वाळू तस्करी व पत्त्यांचे क्लब असे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे नसता न्यायालयात न्याय मागावा लागेल अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुदर्शन अग्रवाल यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना दिले आहे
सिल्लोड तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये बेसुमार अवैध दारू विक्री सुरू आहे यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असून तालुक्यात अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत त्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये भांडणांचे प्रमाण वाढले असून या अवैध धंद्यांना पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे यामुळे सिल्लोड तालुक्यात शांततेचे वातावरण असून यास कारणीभूत असणाऱ्या पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा सुरू आहे अनेक वाळू तस्कर या वाळूच्या धंद्यातून गब्बर होत असून अशा वाळूतस्करांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे सिल्लोड तालुक्यात रात्रंदिवस असे अवैध धंदे व वाळू तस्करी सुरू असल्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत या सर्व अवैध धंद्यांना पोलीस व महसूल प्रशासनाचे पूर्णपणे सहकार्य लाभत आहेत व यावर धंद्याच्या माध्यमातून पोलीस व महसूल प्रशासन मलिदा लाटत असल्याचे चित्र दिसत आहे तरी याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे नसता मला नागरिकांच्या न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला लागेल असे सुदर्शन अग्रवाल यांनी निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सुभाष देसाई महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आदींना देण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here