वर्ध्याच्या नितेश कराळे यांचा अशोकदादा गरुड शैक्षणिक व सामाजिक समूह वतीने येथे लाईव्ह संवाद

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे) अशोकदादा गरुड सामाजिक व शैक्षणिक समूह व ज्ञानविकास विद्यालय भराडी यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिक्स करिअर अकॅडमी वर्धा चे संचालक नितेश कराळे यांचा गूगल मीट द्वारे लाईव्ह संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अशोकदादा गरुड, गटशिक्षण अधिकारी दिलीप शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुगल मिटद्वारे लाईव्ह संवाद साधतांना नितेश कराळे म्हणाले की, मातृभाषेतून व समजेल त्या भाषेत अध्यापन केल्यास व्यवस्थित आकलन होते. पुस्तकी भाषा, प्रमाण भाषा मर्यादित अध्यापन देते म्हणून बोलीभाषेतून शिक्षणाचा आग्रह प्रत्येकाने धरला पाहिजे.शिक्षकाने कोणताही विषय शिकवतांना प्रात्यक्षिक करून दाखवल्यास तो कधीही विसरणार नाही, तसेच शिक्षक हा चांगला कलाकार असला पाहिजे व प्रत्येकाची एक कला असतेच ती न लाजता न भिता मांडली गेली पाहिजे.आजूबाजूचा परिसर, भोवतालची परिस्थिती,व चांगल्या लोकांशी विदयार्थ्यांचा प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद घडवून आणल्यास भविष्यात चांगला समाजसेवक,एक चांगला देशभक्त निर्माण होऊ शकतो. गोर-गरीब,आत्महत्याग्रस्त ,शहीद,व शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे यातून निश्चित समाधान मिळवता येते,मंदिरातील दानापेक्षा झोपडीतील व गरजू मुलांना वह्या पुस्तके दिल्यास त्याचे पुण्य कितीतरी पटीने मोठे आहे.आपण धार्मिक प्रार्थना स्थळासमान संसदेला माणल्याशिवाय डॉक्टर अब्दुल कलमांच्या स्वप्नातील भारत निर्माण होणार नसल्याचे मत व्यक्त केले.मानव बना, भारतीय बना येकूण, वाचून,समुजन शिक्षकाने अध्यापन केल्यास विध्यार्थी सुधारणेची, विकासाची क्रांती करतील ती शक्ती फक्त शिक्षकातच आहेत.
कोण आहेत नितेश कराळे ? :- चार वेळा बी. एस. सी.नापास , बी.एड. पदवी असून नोकरी नाहीत म्हणून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना पी. एस. आय, एस. टी. आय.; आर. एफ. ओ. यासह विविध स्पर्धा परीक्षेत अपयश मिळून देखील हार न मानता गावाकडे येऊन शेती करू, मोलमजुरी करू व उपजीविका भागवू या हेतूने मूळ गाव मांडवा जिल्हा वर्धा येथे नितेश कराळे पुण्याहून परत आले. परंतु, नशिबाने हुलकावणी दिली म्हणून व्यक्ती कृतिशील नसतो असे नाही हे हेरून मित्र, नातेवाईकांनी त्यांना विनंती केली की, तुझ्याकडे स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास, अनुभव आहे तो व्यर्थ न घालवता शिकवणी सुरू कर व नितेश कराळेलाही माहीत होते की, आपल्या अंगभूत कौशल्याचा अध्यापनात वेगळेपणाने वापर करत बोलीभाषेतून आपण शिकविल्यास नक्कीच विध्यार्थी यशस्वी होण्यास मदत होईल. आणी फ़िनिक्स करियर अकॅडमीला चार विध्यार्थ्यावर झालेली सुरुवात आज शेकडो वर तर गेलीच व शिवाय कोरोना संसर्ग काळात तयार केलेले वर्हाडी भाषेतील शिकवणीच्या व्हिडीओला महाराष्ट्रभरच नव्हे तर भारताबाहेरही हजारो चाहते निर्माण झाले.व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा त्यांचा उमटला. श्री. कऱ्हा ळे बारा विषय व ,मराठी, हिंदी, इंग्रजी व्याकरण स्वतः शिकवित असतात व मनोरंजनात्मक शिकवणी असल्याने चार चार तास विध्यार्थी मन एकाग्र करून एक जागी असतात 250 पेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे व्हिडिओ त्यांचे असून ज्वालामुखी कसा उसळतो व त्याचे काय परिणाम होतात हा व्हिडिओ मागील पंधरा दिवसापासून प्रचंड व्हायरल झाला व श्री. कराळेला पाहण्याची, ऐकण्याची चाहत्यांची गर्दीही उसळली. यावेळी या चर्चा सत्राला श्री.सतीश देशमुख उप प्राचार्य सरस्वती विद्यालय तळणी,
कुशल देशमुख मुख्याध्यापक आमठाणा,
भरत सुपेकर मुख्याध्यापक घाटनांद्रा,
कय्युम शेख मुख्याध्यापक घाटनांद्रा,
बनभरे सोनाली मुख्याध्यापिका यशदा पब्लिक औरंगाबाद,
संतोष सोनवणे संस्थापक अध्यक्ष होलिफेथ इंग्लिश स्कुल भराडी,
युवराज शेलार संस्थापक गुरुकुल इंग्लीश स्कुल करंजखेड,दीश्वरे योगेश टाकळी, श्री. जैवाळ वारकरी शिक्षण संस्था निल्लोड,
मंगल एंडोले ,आशिष पवार यासह अशोकदादा शैक्षणिक व सामाजिक समूहाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.यु-ट्यूब, फेसबुक, व्हाट्सअप आदी सोशल मीडियावर नितेश कराळे नाविन्यपूर्ण अध्यापन शैलीमुळे प्रसिद्ध आहे. बोलीभाषेतून अध्यापन करत नाममात्र फिस मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करत सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षलागवड, संगोपन,गरजूंना शैक्षणिक साहित्य मदत, भूकंप, पूर परिस्थिती आदी क्षेत्रात मदतीचे कार्य करत असतात.आमच्या शैक्षणिक व सामाजिक समूह माध्यमातून विविध उपक्रम राबऊन नाविन्यपूर्ण व सृजनशीलता निर्माण व्हावी या हेतूने आजच्या नितेश कराळे यांच्या लाईव्ह संवादातून बदलती शिक्षण पद्धती,मनोरंजनात्मक अध्यापन प्रत्येक शिक्षकाने समजावून घेऊन, आपल्या अध्यापनात नाविन्यपूर्ण आणावे यासाठी करणे गरजेचे असल्याने श्री. कराळे यांचा शोध घेत संपर्क करत हे चर्चासत्र आयोजित केले होते.
अशोक गरुड,
संस्थापक अध्यक्ष,
अशोकदादा गरुड सामजिक व शैक्षणिक समूह भराडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here