युवकाचा तलावात बुडून मृत्यू

0

सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील चिंचवन वडाचे येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ता. 25 रोजी घडली.
चिंचवन येथील युवक सुदाम रघुनाथ जरारे (30 ) ता. 24 युवक शेतात जाऊन काम करून घरी आल्यानंतर अंघोळी साठी तलावात गेला. संध्याकाळी सदरील युवक घरी न आल्याने याची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर
ग्रा. पो. स्टेशन सिल्लोड यांना सदरील घटनेची माहिती देण्यात आली. सदरील युवक तलावाच्या दिशेने गेला असल्याने पोलिसांना कळताच त्यांनी तलावाजवळ शोध घेतला. त्यानंतर 25 रोजी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाला मृतदेह शोधण्यात यश आले. पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा अचानक तोल गेल्याने तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून
सिल्लोड ग्रामीण चे सचिन सोनार ,काकासाहेब सोनवणे यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन ना साठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here