औरंगाबाद – महानगरपालिका आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा औरंगाबादकरांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे औरंगाबाद पुणे महामार्गावरील छावणी परिसरात असलेल्या कोविड टेस्ट सेंटर याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची कुठलीही चौकशी न करता त्याची कोविड टेस्ट न करता त्याला सरळ औरंगाबाद शहरात प्रवेश मिळत आहे त्याच्यामुळे का होईना औरंगाबाद शहराचा आकडा दिवसेदिवस झपाट्याने वाढत आहे व मृत्यूचा दर देखील वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे .
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यामध्ये दररोज चारशे ते पाचशे कोरुना बाधित रुग्ण आढळत आहे आरोग्य यंत्रणा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कामाला लागलेले आहेत तरीपण पण एवढ्या मोठ्या संख्येने आकडा का वाढत आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे असाच एक प्रकार समोर आला आहेत औरंगाबाद पुणे महामार्गावरील छावणी परिसरात असलेल्या कोरोना टेस्ट सेंटर याठिकाणी महामार्ग बंद करून वळवण्यात आल्या आहेत पण याठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातून येणारा वाहनाची कुठलीही चौकशी न करता त्याची टेस्ट न करता त्याला सरळ सरळ शहरात प्रवेश मिळत आहे . याच कारणामुळे औरंगाबाद शहरात रुग्णांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे याला महानगरपालिका आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे .तरी येथे दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी करून त्यात असलेल्या नागरिकांची कोरणा टेस्ट करावी अशी मागणी होत आहे .
(प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे औरंगाबाद )