मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस उत्साहात साजरा

0

औरंगाबाद – भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर निजामाच्या पाशातून स्वतंत्र झाला .
मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस त्याचा उत्सव आजच्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना अभिवादन करून साजरा केला जातो .

आज72 वर्ष पूर्ण झाले आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम एक थरारक घटना 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र चा उत्सव साजरा करीत असताना मराठवाडा हा गुलामीत होता 17 सप्टेंबर 1948 रोजी अनेकस्वातंत्र्य सेनानी शहीद झाले या राज्यांमध्ये कुणालाही निजामाच्या विरोधात जाण्याची मुभा नव्हती कुठलेही स्वातंत्र्य मराठवाड्यातील नागरिकांना नव्हते मराठवाड्यातील अनेक भूमिपुत्र शहीद झाल्याच्या नंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा भाग स्वतंत्र भारतात सामील झाला त्यावेळेस मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले त्याचीच आठवण म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सादर करण्यात येतो औरंगाबाद शहरातील हा कार्यक्रम सिद्धार्थ उद्यानामध्ये दरवर्षाप्रमाणे साजरा केला जातो या ठिकाणी ध्वजारोहण होऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृती स्तंभास पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करीत होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडया, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते .
(प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे औंरगाबाद )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here