सदस्यांकडून चेअरमन व सचिव विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून होते.त्यामुळे सेवा सोसायटी शेतकऱ्यांची कामधेनू आहे. शेतकऱ्यांपर्यंत लाभार्थी योजना पोहचविण्यासाठी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांना दक्षता घ्यावी लागते.परंतु याउलट स्थिती जांभई ता.सिल्लोड येथे पहावयास मिळत आहे.
जांभई येथील विवीध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी सदस्य व लाभार्थी पासून वंचित शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन त्यांची दिशाभूल करत अफरातफर केल्याची तक्रार सदस्याद्वारे निवेदनाच्या माध्यमातून सहाय्यक सह निबंधक साहेब ( दुय्यम सह निबंधक कार्यालय सिल्लोड ) यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनाद्वारे सोसायटीच्या सदस्यांनी आपल्या तक्रार अर्जात विविध कार्यकारी सह. सोसायटीचे चेअरमन नामे कैलास भावराव शिंदे व सचिव नामे पठारे साहेब यांनी संगनमत करून व पदाचा गैरवापर करत शासकीय योजनेचा योग्य त्या लाभार्थ्यांना लाभ न देता व सदरील योजना ह्या शेतकऱ्यांसाठी असताना व ज्या व्यक्तींकडे 7/12 नसताना देखील भूमिहीनांना त्यांनी अशा योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे.वास्तविक पाहता खरे लाभार्थी शेतकरी असून त्यांना या योजनेपासून दूर ठेऊन त्यांची दिशाभुल केली आहे.अशा वंचित शेतकऱ्यांनी आम्ही सद्स्य असल्याकारणाने आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
अशावेळी जेव्हा चेअरमन व सचिव यांच्याशी संपर्क साधून सभा घेण्याचे सुचविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन सभेस विरोध दर्शविला आहे.
सध्या कोरोना महामारीच्या संसर्गात शासनाने शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे व्याज वसूल करू नये असा आदेश असताना सोसायटी चेअरमन व सचिव यांनी गोरगरीब जनतेकडून भागधारक पावतीचे पावती न देता पैसे वसूल केले आहे व ही रक्कम संगनमताने हडप केलेली आहे.
आपल्याकडे असलेल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या व सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांची तसेच बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी असे या निवेदनात म्हंटले आहे.
एकीकडे कोरोना महामारी व अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल होऊन संकटात सापडलेला असताना सामान्य शेतकरी व गोरगरीब जनतेची ही फार मोठी फसवणूक झाली आहे.
याद्वारे सद्स्य सीताराम सखाराम शिंदे,दौलत तुळशीराम शिंदे,कैलास बाळा शिंदे,धनाजी प्रभाकर शिंदे,आरती विठ्ठल शिंदे,हुसैन मैदू, रुक्मिणबाई कृष्णा शिंदे,रेखाबाई विठ्ठल शिंदे सर्व रा.जांभई यांनी तक्रार निवेदनात स्वाक्षरी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here