मृतदेहाचे गूढ उकलण्यात पनवेल पोलिसांना मोठे यश

0
  • मुंबई – पनवेल तालुका पोलीस ठाणे , नवी मुंबई हद्दीत दिनाक 16/09/2020 रोजी सकाळी 08:30 वा चे सुमारास मोरबेगावचे हद्दीत असलेले मोरबे धरणाचे जलाशयामध्ये रस्सीने व तारेने एका 48 किलो वजनाचे सिमेंटचे पोलभोवती समांतर गुंडाळुन बांधलेले स्थितीत एका अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील महीलेचा मृतदेह तरंगत असताना मिळुन आलेला होता . मृतदेह पाण्यात जास्त काळ राहील्याने तो सडलेले व फुगलेले असस्थेत असल्याने मृतदेहाचे चेहरा विद्रुप झालेला असल्याने ओळखण्याचे स्थितीत नव्हता . यावरून पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजि . नं . 131/2020 भादवि कलम 302,201 दाखल करून मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेवुन पुढील तपास चालु केला . मृतदेह मिळुन आला त्यावेळी मयत महीलेचे एका हातामध्ये फक्त बांगडया व गोंदलेले चिन्ह होते , मयताचे अंगावर कोणत्याही प्रकारची कपडे नसल्याने व संपुर्ण प्रेत फुगल्याने चेह – यावरून मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते . गुन्हयाचे घटनेचे ठिकाणी वरीष्ठांनी भेट देवुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे श्री बिपीनकुमार सिंह साहेब पोलीस आयुक्त , नवी मुंबई . डॉ.श्री . जय जाधव साहेब , पोलीस सह आयुक्त , नवी मुंबई , श्री अशोक दुधे साहेब , पोलीस उप आयुक्त , परि 2 , पनवेल , श्री प्रविण पाटील साहेब , पोलीस उप आयुक्त , गुन्हे शाखा , श्री रविंद्र गिड्डे साहेब , सहा.पो. आयुक्त पनवेल विभाग , श्री विनोद चव्हाण , सहा . पो . आयुक्त , गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी गुन्हयाचा तपास चालु करून , गुन्हयाचे तपासकामी पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे तपास पथक तयार केले . पनवेल तालुका पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील तपास पथकाने गुन्हयाचा तपास चालु करून , मयताचे एका हातात असलेले बांगडया व गोंदलेले चिन्ह या छोटयाशा पुराव्यावरून साक्षीदारांचे मार्फतीने मृतदेहाची ओळख बारा तासाचे आत पटवण्यात यश प्राप्त झाले . त्यानुसार सदर मृतदेह हा आकुर्ली , पनवेल येथे राहणारे एका 27 वर्षे महीलेचा असल्याचे निष्पन्न झाले . तपासादरम्यान माहीती मिळाली की , सदर महीलेचे कोप्रोलीगाव येथे राहणारे 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबंध होते . तसेच सदर महीलेकडून त्याने काही रक्कमही घेतलेली होती . सदर पैशांवरून त्यांचेत नेहमी वाद होत होते . त्या वादातून त्यानेच साथीदारांचे मदतीने सदरचे कृत्य केल्याबाबत बातमीदाराकडून खात्रीशिर माहीती मिळाली होती . मिळाले माहीतीनुसार सदर युवकाचा शोध घेत असताना तो गुन्हा दाखल झाल्यापासुन गावातून पसार झाल्याची माहीती मिळुन आली होती . संशईत आरोपी हा त्याचे इतर साथीदार व मयताचे लहान मुलीसह सध्या सातारा जिल्हयातील कोरेगाव परिसरात फिरत असल्याची माहीती बातमीदाराकडून मिळाली होती , त्याप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी अमलदार कोरेगाव , जि . सातारा येथे पाठवण्यात आले होते . तपास पथकातील अधिकारी अमलदारांनी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनिल गोडसे व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचे मदतीने संशईत आरोपींचा शोध घेवुन गुन्हयातील मयत महीलेशी अनैतिक ठेवणारा 32 वर्षीय युवकासह त्याचे 23 ते 29 वर्षे वयाचे तीन साथीदार यांनाही दिनांक 18/09/2020 रोजी कोरगाव , जि . सातारा येथुन ताब्यात घेवुन , पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता , त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेनुसार चारही आरोपींना अटक करून गुन्हा 48 तासाचे आत उघडकीस आणण्यात पनवेल तालुका पोलीस स्टेशनला यश आलेले आहे . अटक आरोपी यांचे ताब्यात मयत महीलेची 07 वर्षीय मुलगीही मिळुन आलेली आहे . तिचेबाबत बाल कल्याण अधिकारी , पनवेल – रायगड यांचेकडून आदेश प्राप्त करून घेवुन सुरक्षिततेसाठी सद्या बालगृहात ठेवण्यात आले आहे . गुदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत , सपोनि विजय खेडकर , सपोनि नितीन पगार , सपोनि नितीन बडगुजर , मसपोनि योगिता कुदळे , पोउपनिरी सुनिल गुरव , पोहवा / 142 मंगेश महाडीक , पोहवा / 983 शंकर अवतार , पोहवा / 1547 अजित म्हात्रे , पोहवा / 30 अमोल कांबळे , पोहवा / 2610 मंगेश भुमकर , पोना / 1817 सागर रसाळ , पोना / 2213 राकेश मोकल , पोकों / 12119 संदिप चौधरी , पोकों / 3182 तुषार पाटील , पोकॉ / 3171 संतोष पाटील , पोकॉ / 12340 राजकुमार सोनकांबळे , पोकॉ / 12556 सुनिल खैरनार , पोकों / 3455 लिंबाजी कायपलवाड यांनी महत्वपुर्ण कामगिरी केलेली आहे . गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत हे करीत आहेत . आरोपी दिनांक 25/09/2020 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here