बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत.

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) बिबट्या पासून बचाव करण्यासाठी वनविभागाच्या वतीने केल्या उपाय योजना.

अनेक दिवसांपासूनअजिंठा परिसरातील डोंगराळ भागातील गावांमध्ये बिबट्या चे शेतकरी व ग्रामस्थांना दर्शन झाल्याने या परिसरातील शेतकऱ्या मध्ये मोठी दहशत निर्माण झाल्याने शेता मध्ये मजुर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. तसेच शेतीचे कामे करण्यासाठी शेतकरी आता समूहाने शेतात जात असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील डोंगराळ भागांमध्ये मागील अनेक दिवसांपासून या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना बिबट्या चे दर्शन झाले आहेत बिबट्याच्या दर्शनामुळे मुकपाट ,पिंपळदरी ,बाळापुर ,अजिंठा या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतामधी काम करण्यासाठी मजूर देखील मिळणे मुश्किल झाले आहे अजिंठा वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये
वन्यप्राण्या विषयी जागृती केली आहे. मुकपाट व अजिंठा येथे शेतकऱ्यांना बोलावून वन्य प्राण्यांपासून कशाप्रकारे सावध राहावे जेणेकरून ते आपल्याला कुठलेही नुकसान पोहोचवू शकणार नाही यासाठी आपण कसली काळजी घ्यावी या सर्व बाबी विषयी वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे . व या भागातील शेतकऱ्यांना बिबट्या आढळल्यास त्यांनी त्वरीत वन विभागाशी संपर्क साधावा असे वन परिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगधरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here