अंगणवाडीतील सर्व सेवा हायटेक करण्याचा मानस- श्‍वेता गडाख

0

नाशिक – टाकेहार्ष अंगणवाडी केंद्र, सामुंडी विभाग, प्रकल्प त्रंब केश्र्वर, नाशिक येथील अंगणवाडीत पोषण अभियान अंतर्गत नवीन गरोदर मातेची नोंदणी व स्वागत का र्य क्रम घेण्यात आला.. यात गरोदर माता व त्यांचे पती यांना लसीकरण, चौरस आहार, अमृत आहार, वजन वाढ, 1000 दिवसांचे महत्व यावर मार्गदर्शन केले.. तसेच पोषणाचे महत्व अधिक चांगल्या पद्धतीने मनात रुजावे यासाठी *सेल्फी पॉइंट* ही संकल्पना राबविली.. आपल्या साठी अंगणवाडीत वेगवेगळ्या योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबविली जात असल्याने लाभार्थी आनंदी असून अंगणवाडीतील सर्व लाभ चांगल्या पद्धतीने घेत आहेत आणि आमच्या अंगणवाडी ताई ला सहकार्य करत आहे.. सेल्फी पॉइंट तशी शहरी भागात कॉमन आहेत पण दुर्गम आदिवासी भागात ह्या संकल्पनेचे स्वागत लाभार्थ्यांनी केले आहे.. CBE मधील सर्वच कार्यक्रमांसाठी आम्ही संकल्पना पूर्ण सामुंडी विभागातील 25 अंगणवाड्या मध्ये राबवत असून यापुढे या फोटोची कॉपी आम्ही लाभार्थ्यांना आठवण म्हणून देणार आहोत.. अंगणवाडी केंद्र नाही तर अंगणवाडीतील सर्व कार्यक्रम व सेवा हायटेक करण्याचा आमचा मानस आहे. असे सामुंडी विभाग, त्रंब केश्र्वर ट्राय बल प्रोजेक्ट, नाशिक..
पर्यवेक्षिका – श्वेता प्रकाश गडाख सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here