औरंगाबाद ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे ) जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य असताना काही ठिकाणी मास्क न वापरता नागरिक रस्त्यावर फिरत आहे अशा नागरिकावर महसूल विभागात अंतर्गत पथक नेमून कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा या गावांमधील बस स्थानक परिसरात पोलीस, ग्रामपंचायत, तहसील ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,व महसूल विभागाअंतर्गत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अजिंठा येथील बसस्थानकावर वरील विभागातील दहा ते पंधरा अधिकारी व कर्मचारी हे रस्त्यावरून फिरणार्या दुचाकी-चारचाकी वाहनावरील नागरिकांनी मास्क चेहऱ्यावर न दिसल्यास त्यांना थांबून त्यांच्या वर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून कारवाई सिल्लोड तालुक्यातील अनेक गावात सुरू आहे. असे पथक सिल्लोड तालुक्यासाठी एकूण अकरा करण्यात आले असून हे पथक विविध ठिकाणी जाऊन मास्क नाही वापरणाऱ्या कारवाई करीत आहे.असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मराठे यांनी सांगितले आहे,