औरंगाबाद ( प्रतिनिधि -विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे हक्काचा दिव्यांग पाच टक्के निधी वाटप करण्यात विलंब झाला हक्काचा पाच टक्के निधी त्वरित वाटप करावा अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निलेश काळे,अक्षय जगताप,अजय धनवई यांनी सरपंच व ग्रामसेवकाकडे निवेदनाद्वारे केली होती.तर हक्काचे पाच टक्के निधी दिव्यांगांना मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडी निलेश जगताप यांनी डफली बजाओ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
शिवना येथे ८६ अपंगाच्या अधिकृत नोंदणी ग्रामपंचायत कडे आहे.दिव्यांगांना दरवर्षी दिव्यांग प्रकाराच्या आधारावर निधी गेल्या काळात वाटपही झाला नाही.
दिव्यांग व्यक्तींसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून शिवना ग्रामपंचायतीकडे ८६ अपंगांची अधिकृत नोंदणी आहे. या दिव्यांगांना यापूर्वी निधी वाटप झाला आहे. या आर्थिक वर्षात तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त निधी वाटप करणे गरजेचे होते. मात्र मुदत संपूनही दिव्यांगांना निधी व साहित्य मिळालेले नाही.
दिव्यांग आर्थिक सहाय्य निधी वाटप संदर्भात( दि.४( रोजी शिवना येथे ग्रामपंचायत कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी चा डफली बजाओ आंदोलन होनार होते, परंतु कोरणा संसर्ग होऊ नये म्हणून सामाजिक अंतर राहून पोलीस प्रशासनाने व कमी लोकात शांततेत आंदोलन करण्यात यावा असे परवानगी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निलेश जगताप यांनी दोन-चार अपंगाच्या व दोन तीन कार्यकर्त्यांच्या साक्षीने ग्रामपंचायत कडे वाटचाल केली.शांततेच्या सनदशीर मार्गाने आंदोलन केले
परंतु ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक हजर झाले नाही.
ग्रामपंचायत सरपंच संतोष जगताप यांनी या लोकांना भेटून आश्वासन दिले की ग्रामपंचायत महसूल मिळाल्यानंतर लगेच दिव्यांगा चा निधी वाटप केला जाईल .
ग्रामसेवक रवींद्र पाटील हजर झाला नाही म्हणून हा आंदोलन अपुरा झाले.असे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते
निलेश जगताप यांनी कळवले
८६ अंपंग अंदोलनात भाग घेनारे होते.घरी राहिल्याने दिव्यांगनी ८० बसुन आक्रोश दाखवलं.
अपंग दिव्यांग लोकांचे निधी वाटप शिवना ग्राम पंचायत यानी केला नाही.परतु हे अंदोलन झाले तर एकुण ८६ लोकाना निधी वाटप करावा लागेल या साठी ग्राम विकास अधिकारी यानी आपली गैर हजेरी लावली
असो पर्वा नाही
आम्ही आज हरलो नाही तर आम्हाला पुढ़िल मार्ग मोकळा केला आता पुढ़िल अंदोलन हे पंचायत समिति समोर मोट्या प्रमाणात तर तालुका ची सर्व ताकद लाऊन वंचित बहुजन आघाडी लवकरच अंदोलन करणार आहे.
शिवणा येथील दिव्यांग निधी घोळ प्रकरणात व तसेच शिवना ग्राम पंचायत शासकीय निधीची चौकशी करुन ग्राम विकास अधिकारी याना निलंबित करावे असे मागणी मुख्य असुन दिव्यांग याना न्याय देनाचे काम करु
या आंदोलनात सहभागी नोदवली
मा के के जगताप
रहिम पठाण ‘सुभाष जगताप , सतिश साळवे, साहेबराव मानकर, कुरैशी, शिंदे,भाऊसाहेब जगताप आदी हजर होते.
“ग्रामपंचायत महसूल बराच थकलेला आहे लवकरात लवकर महसूल जमा करून या दिव्यांग लोकाना नीधी दिला येईल”.
– संतोष जगताप सरपंच शिवना ग्रामपंचायत .
सरपंच हजर असले तरी
दिव्यांग निधी संदर्भात
आश्वासन पत्रात आम्हाला ग्रामसेवक ग्रामीण सेवक यांची हजेरी व स्वाक्षरी पाहिजे.सरपंच हजर असले तरी दिव्यांग निधी संदर्भात ग्राम पातळी वर अंदोलन झाले आता पुढिल १५ तारखे परियंत अंदोलन मोट्या प्रमाणात पंचायत समिति समोर करणार आहे.दिव्यागाना न्याय मिळे पर्यंत
गप्प बसणार नाही”
-:-निलेश जगताप वंचित बहुजन आघाडी शिवना.