ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे राष्ट्रीय अतिरिक्त महामंत्री आयु.मा.बी.के.खोइया साहेब (मुंबई) हे असोसिएशन चा कामानिमित्त दिल्ली येथे जात असताना मनमाड रेल्वे स्टेशन वर ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी त्याच्यासोबत झोनल कार्याध्यक्ष आयु.हेमंत जाधव (मुंबई),आयु.सतिषभाऊ केदारे (झोनल अति.सचिव) होते.असोसिएशन चे जेष्ठ कार्यकर्ते व कारखाना शाखा चे खजिनदार विजय गेडाम यांच्या हस्ते आयु.मा.बी.के.खोइया साहेब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदिप गायकवाड अध्यक्ष ओपन लाईन, रमेश पगारे अति.सचिव कारखाना शाखा,सागर गरूड उपाध्यक्ष कारखाना शाखा,प्रेमदिप खडताळे, रोहित भोसले, राकेश ताठे, राहुल शिंदे, हर्षल सुर्यवंशी, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते. झोनल कार्याध्यक्ष आयु.हेमंत जाधव साहेब यांच्या हस्ते असोसिएशन चे सक्रिय कार्यकर्ते हर्षल सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here