सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे) देऊळगाव राजा: समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी ग्राम धानोरा येथे जाऊन ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, हल्लीच्या काळात शेतीमधून जास्त पैसे कमवण्यासाठी कापूस यासारख्या पिकांची लागवड होते. त्यामुळे भविष्यात पशु खाद्य कमी पडण्याची भीती जाणवते, म्हणूंन खाद्य वाया न जाऊ देता जनावरांना पुरवण्यासाठी पशुखाद्य प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
पशुखाद्यांवर प्रक्रिया केल्यामुळे खाद्याची चव वाढते, त्यामुळे जनावरे उष्टाळ टाकत नाही. व खाद्य वाया जात नाही.दुग्धजन्य प्राण्यांना दररोज वेळेवर योग्य प्रमाणात खाद्य दिल्यावर दुधात वाढ होते.ही प्रकिया कमी खर्चिक व सोपी आहे ,हे शेतकऱ्यांना पटवुन दिले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्रा. मोहजीतसिंग राजपूत,प्रा.श्वेता धांडे, हे उपस्थित होते.*पशु खाद्यावर प्रक्रिया प्रात्यक्षिका द्वारे दाखवून दिले.1 क्विंटल पशु खाद्य प्रक्रियेसाठी दोन किलो युरिया,500 ग्राम मीठ,एक ते दीड किलो गुळ,40 लिटर पाणी यांची आवश्यकता असते,वरील सामग्रीचे मिश्रण करून पशु खाद्यावर फवारावे.त्यानंतर प्रक्रिया केलेले पशुखाद्य हे 21 दिवस ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावे.नंतर प्राण्यांना आपण ते टाकू शकतो,हे शेतकऱ्यांना सांगितले.आदी बाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतकरी विष्णु खंबाट,संतोष काकडे,आजीनाथ बिडवे तसेच समर्थ कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत,समाधान काकडे, विष्णु काळे हे उपस्थित होते,