शिवैक्य परमवंदनीय राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

0

मनमाड  – शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे सर यांच्या आदेशान्वये मनमाड शहर शिवा संघटनेच्या वतीने शिवैक्य परमवंदनीय राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली कार्यक्रम शहरातील मुक्तागंण जिमखाना येथे संपन्न झाला.
समाजातील ज्येष्ठ व्यक्ती असलेले गोंविद लिंगायत यांच्या हस्ते डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

मनमाड शहर शिवा संघटनेच्या वतीने सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करत श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शहराध्यक्ष कैलास वाडकर, नितीन गुळवे , हर्षद कोरपे, प्रशांत तक्ते, मदन हिंगमिरे, अशोक बिदरी , अमोल हिंगमिरे,कुणाल गोंधळे, पवन वाडकर, विजय तोडकर, अभिषेक गोंधळे, सिध्देश गुळवे, सौरभ वाडकर तसेच लिंगायत गवळी समाजाचे ज्ञानेश्वर नागापुरे,रामा निस्ताने, नामदेवराव गवळी आदिसह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here