
सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार,बोरगाव सारवणी परिसरातील पुर्णा नदी पात्रातून तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने वाळूचा अवैध उपसा जोरात सुरु असल्याच विदारक चित्र समोर आले असून त्या अवैध उपसाबाबत आम आदमी पक्षाचे जिल्हा सहसंयोजक अॅड शेख उस्मान शेख ताहेर यांनी संबधित सजेचे तलाठी श्री इंगळे व मंडळ अधिकारी श्री गणपत दांडगे यांना त्यांच्या दुरध्वनीवरुन विचारना केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अवैध वाळू उपसा करणा-या वाळू तस्काराला पाठीशी घालुन शासनाच्या डोळयात धुळफेक करित त्यांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी की बोरगाव बाजार व बोरगाव सारवणी या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या पुर्णा पात्रात शासकीय पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहिर असून त्या विहिरीजवळच काही फुटाच्या अंतरावर दिनांक 18/08/2020 व 19/08/2020 या दिवशी रात्रीच्या सुमारास काही वाळू तस्कर आपल्या जेसीबी व डिप्परच्या साह्याने सुमारे 150 ते 200 ब्रास वाळू ही अवैध रित्या उत्खनन करुन चोरटी वाहतुक करीत असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हा सहसंयोजक अॅड शेख उस्मान शेख ताहेर यांच्या निदर्शनास आले व त्यांनी तात्काळ त्यांच्या दुरध्वनीवरुन बोरगाव सारवणी सजेचे तलाठी इंगळे व मंडळ अधिकारी गणपत दांडगे यांना सदरील प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन बोलणे टाळले तालुक्यात अशाच प्रकारे अवैध रित्या वाळूची तस्करी होत असून त्यांना तलाठी मंडळ अधिकारी, महसूल प्रशासन,व पोलीस यांचे पाठबळ असल्याच दिसून येते या वाळू तस्काराला तात्काळ आळा घालण्यात यावा अशी मागणी अॅड.शेख उस्मान शेख ताहेर यांनी केली आहे.
